मुंबई : शहापूर तालुक्यातील फुगाळे गावाच्या डोंगरावर एक ड्रोन पडलेल्या अवस्थेत आढळला. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेतेच्या दृष्टीने राज्यभरात सगळीकडेच ड्रोन उडवण्यास बंदी असताना हा ड्रोन आढळल्याने सुरूवातीला नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा ड्रोन जलसंपदा विभागाचा असल्याची माहिती समोर आली आहे. फुगाळे गावानजीकच्या सह्याद्रीच्या डोंगरावर गावातील काही तरूण फिरायला गेले होते. या डोंगरावरड्रोन पडलेल्या अवस्थेत त्यांना दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ड्रोनची तपासणी केली. हा ड्रोन जलसंपदा विभागाचा असल्याची प्राथमिक माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर कसारा पोलिसांनी हा ड्रोन ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
Fans
Followers